
मुंबई : विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. राज्याचे परिवहन मंत्री व पालघर जिल्हा संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज या दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि पीडित कुटुंबांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या कठीण काळात आम्ही सर्वजण, राज्य सरकार नागरिकांच्या सोबत उभे आहोत. शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विरारच्या या दुर्घटनेत ज्यांची घरे गेली आहेत त्यांच्या तात्पुरती राहण्याची सोय बोलींज म्हाडा प्रकल्प येथील घरांमध्ये करण्याबाबत मंत्री सरनाईक यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षाना सूचना केल्या. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सरनाईक यांनी फोनवरून सविस्तर चर्चा केली.