
भाईंदर : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर टोलनाका स्थलांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टोलनाक्याजवळ होत असलेली प्रचंड कोंडी टाळण्यासाठी टोलनाका दोन किमी अलीकडे वेस्टर्न हॉटेलजवळ स्थलांतर करण्यात यावा, अशी मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मागणीवर तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.