
मुंबई : ‘केंद्रीय मिठागर मंत्रालयाने आपल्या ताब्यातील जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षांत हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मिरा-भाईंदर हे अंतर किनारी मार्गे (कोस्टल रोड) केवळ अर्ध्या तासात कापता येईल,’ अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी (ता. २१) दिली.