
मुंबई : राज्यातील ॲप वर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खाजगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. विधानभवन येथे ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी च्या विविध विषयासंदर्भात बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते.