
ठाणे : मेट्रो ९ आणि मेट्रो १० ठाणे व भाईंदर या दोन महापालिका क्षेत्रातून धावणार आहे. या मेट्रोच्या स्थानकांची नावे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सुचवली आहेत. अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या नावांवर आक्षेप घेत, ठाणे आणि भाईंदर या पालिकांच्या हद्दीतील गाव-खेड्यांचे गावपण जपण्यासाठी व आगरी-कोळी समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने मूळ गावांचा तसेच आदिवासी बांधवांनी सुचविलेल्या नावांचा विचार व्हावा, अशी मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.