esakal | किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा सरनाईक ठोकणार दावा
sakal

बोलून बातमी शोधा

किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा सरनाईक ठोकणार दावा

सोमय्यांविरोधात न्यायालयात 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा सरनाईक ठोकणार दावा

sakal_logo
By
राजेश मोरे

मुंबईः भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, आम्ही ठाण्यात कोणत्याही प्रकारची अनधिकृत इमारत बांधलेली नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. तसंच  विहंग गार्डन या इमारतींची तक्रार केलेली चुकीची असून मी या शहराचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना, अनाधिकृतरित्या केलेले नाही आणि करणार ही नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

एवढंच काय तर किरीट सोमय्या यांनी जी काही बदनामी केलेली आहे. आता थेट न्यायालयात त्यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विहंग गार्डनच्या बाबतीत खोदा पहाड निकला चुहा अशी म्हणण्याची वेळ आता सोमय्या यांच्यावर आल्याची टिकाही त्यांनी केली.

10 वर्षापूर्वी आम्ही विहंग गार्डन या इमारती बांधल्या. या इमारती बांधत असताना महापालिकेला शाळेची इमारत बांधून दिली. त्या बदल्यात टिडीआर देणं बाकी असताना आम्ही आधी ती इमारत बांधल्याने आम्हाला तत्कालीन आयुक्तांनी तशी नोटीस बजावली होती. मात्र महापालिकेला जी इमारत बांधून दिलेली आहे, त्याच्या टिडीआरच्या मोबदल्यामध्ये या इमारतींचे बांधकाम केलेले आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी ती नोटीस मागे घेऊन आमच्या इमारती अधिकृत असल्याचा निवार्ळा दिला आहे. तसे सर्टीफीकेट दिले, त्यानंतर आम्ही घरे विकली आहेत, असंही सरनाईक यांनी सांगितलं. किंबुहना त्याच इमारतीत माङो कार्यालय देखील असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

केवळ जाणीवपूर्वक ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या सरनाईक यांच्यावर कधी पाकिस्तानी क्रेडीट कार्ड मिळाले म्हणून तर कधी दाऊद इब्राहिमशी संबध आहे, तर कधी इंटरनॅशनल लेव्हलच्या व्यावसायिकांबरोबर संबध आहेत, फ्रान्सच्या काही राष्ट्रध्यक्षांबरोबर माझी पार्टनशीप फर्म आहे, ठाण्यात व्यावसायिक भागेदारी आहे, असे बिनबुडाचे आरोप मागील 10 ते 20 दिवसापासून भाजपच्या मंडळींकडून सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा-  भाजप नेते गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

किरीट सोमय्या सारख्या नेत्यांनी देखील अशीच कृत्ये मागील काही दिवसापासून केले आहे, मी प्रत्येक शंकेचे निरसरण ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर केलेले आहे. अजूनही काही शंका असतील तरी 100 वेळा येण्यास मी तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच चौकशीला सहकार्य करेल असेही स्पष्ट केले आहे, असंही सरनाईक म्हणालेत.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Pratap Sarnaik would file Rs 100 Crore defamation Kirit Somaiya

loading image