प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पूर्वेश सरनाईक ईडीच्या रडारवर

प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पूर्वेश सरनाईक ईडीच्या रडारवर

मुंबईः मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना सक्त वसुली संचलनायलय (ईडी)पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजाविले आहे. पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातच प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पूर्वेश सरनाईक हेही देखील ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.  मनी लाँड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसंच त्यांचा मोठा मुलगा विहंग सरनाईकही ईडीच्या रडारवर आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेश सरनाईक यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.  पूर्वेश सरनाईक यांना गुरुवारी (10 डिसेंबर) ईडीने नोटीस बजावली आहे. यात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.   टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत ही चौकशी करण्यात येत आहे.

ईडी  प्रताप सरनाईक यांचे वित्तीय व्यवहार आणि  बँक खात्यांबद्दलची माहिती याबाबत चौकशी करणार आहेत.  24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या ईडीच्या विशेष पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यांनंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलगा विहंग याला चौकशीला बोलावले होते. पण, परदेशातून आल्यामुळे सरनाईक कुटुंबीय क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर सरनाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, 10 डिसेंबर रोजी प्रताप सरनाईक यांची ईडीने सलग 6 तास चौकशी केली होती. यावेळी चौकशीला यावे लागणार नाही. जर काही प्रश्न असतील तर जेव्हा बोलावण्यात येईल त्यावेळी मी तात्काळ दोन तासात हजर होईल. तसेच माझ्या कुटुंबीयांमधील कुणालाही आता चौकशीला बोलवण्याची आवश्यकता नाही. खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्न उत्तरे झाली. घोटाळा करणा-यांना कडक शासन झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली होती. मात्र ईडीने पुन्हा प्रताप सरनाईकाना समन्स बजाविल्याने, सर्वांच्या भुवया उंचाविल्या आहेत. पुढील आठवड्यात ही चौकशी होण्याीच शक्यता आहे.

pratap sarnaik younger son purvesh sarnaik summoned by ed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com