मुंबई पालिका आयुक्तांच्या विरोधात विधानपरिषदेत हक्कभंग मांडणार, दरेकरांचा इशारा

मुंबई पालिका आयुक्तांच्या विरोधात विधानपरिषदेत हक्कभंग मांडणार, दरेकरांचा इशारा

मुंबईः  मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याविरुद्ध उद्या विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज येथे दिली.

यासंदर्भात दरेकर यांनी प्रसारमाध्यमांना वरील माहिती दिली. विधिमंडळ सदस्यांना शासकीय कार्यालयांनी जनहितार्थ, कल्याणकारी योजनांची आणि कामांची माहिती दिली पाहिजे, असे नियमानुसार बंधन शासकीय कार्यालयांवर आणि अधिकाऱ्यांवर आहे, असे असतानाही अनेक पत्र पाठवून सुध्दा महापालिकेकडून माहिती देण्यात अक्षम्य टाळाटाळ केली जाते.  कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहारा संदर्भात विचारणा करणारी शेकडो पत्रे आम्ही दिली होती. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या. त्यांच्याकडे काही माहितीही मागवली, पण विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रांना दोन ओळींचे उत्तर देण्याचे सौजन्यही महापालिका आयुक्तांनी दाखवले नाही. प्रत्येकवेळी पत्रांना उत्तर देण्यासाठी टोलवाटोली केली. यामुळे विधिमंडळाने मला दिलेल्या अधिकारांना न्याय देता येत नाही. विधिमंडळाच्या मूलभूत हक्कांवर यामुळे गदा येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तांवर विशेषाधिकारभंग आणणार आहोत, असेही ते म्हणाले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  
विधीमंडळच्या कायदयाने सभासदांना विशेष अधिकार दिला आहे. पण विधानपरिषद आणि विधानसभा सदस्याच्या हक्कांवर गदा येत असेल तर विधीमंडळात हक्कभंग आणण्याचा अधिकार सदस्यांना आहे. सदर विषय हक्कभंग होतो की नाही हे पिठासीन अधिका-यांच्या कार्यकक्षेत येते. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Praveen Darekar warning Infringement Legislative Council against bmc Commissioner

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com