प्रवीण दरेकर यांनी मेट्रो उभारणाऱ्या कामगारांसोबत साजरी केली दिवाळी 

प्रवीण दरेकर यांनी मेट्रो उभारणाऱ्या कामगारांसोबत साजरी केली दिवाळी 

मुंबईकरांचा भविष्यातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी स्वतः अंधाऱ्या घरात राहून मेट्रो उभारणाऱ्या कामगारांसोबत मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांनी दिवाळी साजरी केली. या कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दहीसर ते अंधेरी या मेट्रोसाठी राबणारे कामगार उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार येथून आले असून ते पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील उड्डाणपुलांखाली राहतात. साऱ्या मुंबापुरीत दिवाळीचा झगमगाट सुरु असताना या कामगारांची दिवाळीही आनंदाची जावी म्हणून दरेकर यांनी आज या तीनशे कामगारांना दिवाळी फराळ दिला. या समारंभामुळे या कामगारांच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, मोतीभाई देसाई, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी चौगुले,  मेट्रोचे अधिकारी श्रीधर कामत, परमेश्वर कारले, वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता शिरसाट उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेने केले.

'लोकप्रतिनिधींनी आपल्या अधिकारांचा उपयोग अशा काबाडकष्ट करणाऱ्या लोकांच्या हितासाठी केला तरच त्या सेवेला अर्थ प्राप्त होईल. मुंबई मेट्रोसाठी रात्रंदिवस राबणाऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केल्याचा मोठा आनंद मिळाला, असे दरेकर म्हणाले. या कामगारांना राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यानुसार मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचनाही त्यांनी दिल्या. या कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपणही या कष्टातून आपला परिवास समृद्ध कराल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Webtitle : pravin darekar celebrate his diwali with metro workers in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com