
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश शिक्षणाची कामे महिला बचत गट, सहकारी संस्थांना द्यावीत. तसेच महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपैकी २५ टक्के कामे महिला मजूर संस्था, बचत गट, बेरोजगार संस्थांना मिळावीत, अशी मागणी विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली.