राज्य सरकारला प्रवीण दरेकर यांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम, मंदिरं उघडा नाहीतर

राज्य सरकारला प्रवीण दरेकर यांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम, मंदिरं उघडा नाहीतर

मुंबई : येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने राज्यातील मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पक्ष सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन सारी मंदिरे उघडेल, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे दिला. आज अनेकठिकाणी भाजपतर्फे मंदिरे, मशिदी आणि जैन मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

मागठाणे परिसरातील अशोकवन येथील हनुमान मंदिरात झालेल्या घंटानाद आंदोलनप्रसंगी दरेकर बोलत होते. केंद्राने सर्वधर्मीय मंदिरे उघडण्यास संमती दिली आहे, मात्र महाराष्ट्र सरकार धर्माच्या, हिंदुत्त्वाच्या आणि या प्रक्रियेच्या विरोधात असल्याचे दिसते, अशी टीकाही त्यांनी केली. एकीकडे महसुलासाठी दारु दुकाने, मॉल उघडतात, पण मंदिरे बंदच आहेत हे दुर्दैवी आहे. अजूनही सरकार जागे झाले नाही, तर भाजपतर्फे सर्व मंदिरे उघडली जातील, असाही इशारा त्यांनी दिला. 

महत्त्वाची बातमी - भाजपच्यामते 'मदिरालय चालू, मंदिरं बंद' या निर्णयाविरोधात मुंबईत घुमला घंटानाद आंदोलनाचा आवाज
 
मशिदीही उघडण्याची मागणी

भाजपच्या दक्षिण मध्य मुंबई विभागातर्फे स्थानिक मशिदींसमोरही आंदोलन करून मशिदी उघडण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, आमदार प्रसाद लाड, नगरसेविका शीतल देसाई, राजश्री शिरवडकर आदींनी कार्यकर्त्यांसह सिद्धीविनायक मंदिरासमोर आंदोलन केले. त्यानंतर वडाळ्याचे प्रसिद्ध विठ्ठल मंदिर व राम मंदिर येथे आंदोलन केल्यावर वडाळ्याची हरी मस्जिद व अँटॉप हिलच्या दर्ग्यावरही विश्वस्तांसह हे आंदोलन करण्यात आले. मंदिर, मशीद, गुरुद्वारा, ठाकरे सरकार खोलो दोबारा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भाविकांना अध्यात्मिक समाधान आणि मनःशांती मिळावी यासाठी सरकारने देवळे उघडावीत, अशी मागणी श्रीमती देसाई यांनी यावेळी केली. 

जैन मंदिरातही आंदोलन

खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरीवलीच्या टीपीएस जैन मंदिरात दर्शन घेऊन घंटानाद केला. यावेळी भाजयुमो चे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना, स्थानिक नगरसेवक प्रवीण शाह उपस्थित होते. कांदीवली आणि मालाड येथे झालेल्या आंदोलनात चारकोपचे आमदार योगेश सागर, नगरसेविका जया तिवाना उपस्थित होत्या. सरकारने मंदिरे बंद ठेवलीत मग दारुची दुकाने, बाजारपेठा उघड्या का आहेत, असा प्रश्न विचारीत बोरीवलीच्या नगरसेविका आसावरी पाटील यांनी राजेंद्र नगरच्या हनुमान मंदिराजवळ घंटानाद आंदोलन केले. कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेले हे राज्य सरकार भक्तांच्या भावना जाणीवपूर्वक लक्षात घेत नाही, असाही आरोप पाटील यांनी यावेळी केला.

( संपादन - सुमित बागुल ) 

pravin darekar on opening temples and prayer places in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com