रेल्वेकडून टाळेबंदीचा सदुपयोग; मान्सूनपूर्व दुरुस्तीकामांना वेग

राहुल क्षीरसागर
Wednesday, 20 May 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता केंद्र सरकारने 23 मार्चपासून सर्वत्र टाळेबंदी लागू केली. या टाळेबंदीत मालवाहतूक वगळता सर्व प्रकारची रेल्वे प्रवासी वाहतूक बंदी करण्यात आली. त्यामुळे या टाळेबंदीचा सदुपयोग करीत रेल्वे प्रशासनाने प्रचंड गर्दी असलेल्या मध्य रेल्वेच्या ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच कसारा विभागात डागडुजीची कामे सुरू केली आहेत.

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता केंद्र सरकारने 25 मार्चपासून सर्वत्र टाळेबंदी लागू केली. या टाळेबंदीत मालवाहतूक वगळता सर्व प्रकारची रेल्वे प्रवासी वाहतूक बंदी करण्यात आली. त्यामुळे या टाळेबंदीचा सदुपयोग करीत रेल्वे प्रशासनाने प्रचंड गर्दी असलेल्या मध्य रेल्वेच्या ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच कसारा विभागात डागडुजीची कामे सुरू केली आहेत.

क्लिक करा : मुंबईतील वस्त्या होताहेत सुन्यासुन्या! बेरोजगारीमुळे स्थलांतर वाढले

मध्य रेल्वेवरील कसारा आणि आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाड्यांना विद्युत प्रवाह करणाऱ्या वाहिन्यांची जोडणी असणारे खांब खराब झाल्याने दुरुस्त करण्यासाठी विशेष मेगाब्लॉक घ्यावा लागणार होता. मात्र, टाळेबंदीचा सदुपयोग करीत, रेल्वेच्या ट्रॅक्शन वितरण विभागाने या दोन्ही विभागातील वाहिन्यांची जोडणी असणारे 34 अपराईट मास्टस (वरील आडवे खांब) आणि 17 पोर्टल बुम्स पथकाने अवघ्या काही दिवसात बदलले आहेत. 

रेल्वे प्रशासनाने कसारा आणि आसनगाव या दोन्ही विभागात देखील महत्त्वाची कामे हाती घेतली असून ती अवघ्या काही दिवसात पूर्ण देखील करण्यात आली.  दरम्यान, ठाणे ते कर्जत आणि ठाणे ते कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या स्थानकांमधील पादचारी पूल आणि रेल्वे उड्डाण पुलांच्या खाली असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांची तपासणी रेल्वेतर्फे करण्यात येत आहे. 

मोठा गौप्यस्फोट! असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा 'तो' शपथविधी

तपासणीदरम्यान काही दोष आढळल्यास त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणच्या ओव्हरहेड वायरचीही रेल्वे प्रशासनातर्फे तपासणी करण्यात येत आहे. ही कामे मध्य रेल्वे प्रशासनाने सध्या वेगाने सुरू केली असून पावसाळ्यापूर्वी सर्वच कामे पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.

रुळाशेजारील नाल्यांची सफाई
  ठाणे, कल्याण, डोंबिवली या सतत प्रवाशांनी गजबजलेल्या रेल्वे स्थानकात डागडुजीची तसेच मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली असून अनेक स्थानकांमध्ये आणि रुळांशेजारी असलेल्या नाल्यांची स्वच्छता, रुंदीकरण आणि दुरुस्ती अशी कामे वेगाने सुरु करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या रेल्वे स्थानकांमध्ये रखडलेले पादचारी पूल त्याचबरोबर पावसाळ्यात फलाटांच्या छतांना लागणारी गळती, अनेक ठिकाणी रंगरंगोटी अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर या स्थानकांच्या परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी रेल्वे रुळाशेजारी असलेल्या नाल्यांची सफाई आणि रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre-monsoon repair work started by Railways during Lockdown