esakal | १२ वर्षांपूर्वी केलेली कोरोनाबाबतची 'ही' भविष्यवाणी खरी ठरणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

१२ वर्षांपूर्वी केलेली कोरोनाबाबतची 'ही' भविष्यवाणी खरी ठरणार ?

१२ वर्षांपूर्वी केलेली कोरोनाबाबतची 'ही' भविष्यवाणी खरी ठरणार ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यात कोरोनाबद्दल निरनिराळ्या प्रकारचे दावे केले जात आहेत. काही लोकं कोरोनाचा संबंध काही जुन्या कादंबरी आणि पुस्तकांशी जोडत आहेत. अशीच एक भविष्यवाणी पुन्हा समोर आली आहे. १२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकात कोरोनाचा उल्लेख आढळला आहे.

महत्वाचं ! कोरोनासाठी 'मास्क' ऐवजी 'रुमाल' वापरावा का?.. उत्तर आहे..  
 
काही दिवसांपूर्वी 'डिन कोंटोझ' यांनी लिहिलेल्या 'द आइज ऑफ डार्कनेस' या कादंबरीनं सगळ्यांना आश्चर्यचकित केलं होतं. या कादंबरीत 'वूहान-४००' नावाचा व्हायरस चीनच्या वूहान शहाराजवळ तयार होईल आणि यामुळे अनेकांचे जीव जातील अशी कथा सांगण्यात आली होती. त्यामुळे ४० वर्षांपूर्वीच कोरोनाबद्दल भविष्यवाणी झाली होती की काय अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता यात अजून एका पुस्तकाची भर पडली आहे. 

कोणतं आहे हे पुस्तक ? 

'एन्ड ऑफ डेज' असं या पुस्तकाचं नाव आहे. अमेरिकेच्या लेखिका 'सिल्विया ब्राउनी' यांनी हे पुस्तक २००८ साली लिहिलं आहे. सिल्विया मनोवैज्ञानिक होत्या. त्या स्वत:ला आध्यात्मिक गुरु मानत होत्या त्यांचे काही कार्यक्रमही अमेरिकेच्या टीव्हीवर चालवण्यात आले होते. त्यांच्याकडे काही अलौकिक शक्ती आहेत असं ही काही लोकांचं म्हणणं होतं. मात्र २०१३ साली त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या या पुस्तकात ही कोरोनाबदल भविष्यावाणी करण्यात आली आहे.  

हेही वाचा: कोरोनाची दहशत अफवा आणि सत्य..  

काय आहे ही भविष्यवाणी ?

"२०२० मध्ये न्यूमोनियासारखा एक गंभीर आजार पूर्ण जगात पसरेल. हा आजार फुफ्फुस आणि श्वसनासंदर्भात असेल आणि यावर कोणताही उपाय उपलब्ध नसेल. हा आजार वाऱ्याच्या वेगानं जगात पसरेल. मात्र काही दिवसांनी हा आजार आपोआप नष्ट होऊन जाईल. ज्या वेगानं तो आला होता त्याच वेगानं तो नष्ट होईल. तसंच हा रोग १० वर्षांनी पुन्हा येईल आणि तसाच नाहीसा होऊन जाईल." असं End Of Days या पुस्तकात 'सिल्विया ब्राउनी' यांनी लिहिलंय. 

कोरोनाबद्दल सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. या मागचं सत्य काय हे कोणालाही माहिती नाही, मात्र हे पुस्तक आता चांगलच व्हायरल होत आहे. 

Prediction found about Corona virus in 12 years old book read full story


         

loading image