esakal | कोरोनाची दहशत अफवा आणि सत्य.... 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाची दहशत अफवा आणि सत्य.... 

कोरोनाची दहशत अफवा आणि सत्य.... 

sakal_logo
By
चंद्रकांत दडस

मुंबई - जगभरात कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत हजारो जणांचा बळी गेला असून, या कोरोना व्हायरसच्या बाबतीन अनेक अफवा पसरवण्यात येत आहेत. वुहान येथे कोरोनाचा विषाणू आढळल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याचसोबत अनेक अफवांना ऊत आला.

मोठी बातमी - कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला...

वुहान येथील मांसविक्री होणाऱ्या मार्केट परिसरात हा विषाणू आढळल्यानंतर चिकन, अंडी, मासे, मांस खाल्ल्याने कोरोना व्हायरस होत असल्याच्या अफवा सुरू झाल्या. हे म्हणणे पटवून देण्यासाठी अनेक जण कोणत्याही देशातील व्हायरसशी संबंधित नसलेली छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करू लागले. त्यामुळे अनेकांनी घाबरून जात मांसाहार करणेच बंद केले आहे. ही अफवा ठरली असली त्याचा परिणाम मात्र या व्यवसायांवर झाला असून चिकन खाणाऱ्यांचे प्रमाण तब्बल 70 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहे. 

दुसरी अफवा म्हणजे होळीचे रंगीत फुगे, रंग, चायना वस्तू, पिचकारी या चीनमधून मोठ्या प्रमाणावर येतात. या वस्तूंच्या माध्यमातूनही कोरोना व्हायरस तुमच्या घरापर्यंत येण्याची भीती आहे. त्यामुळे भारतीयांनी होळीचा सण साजरा करू नये, असे आवाहन व्हॉट्‌स ऍपवरून करण्यात येत आहे; मात्र ही सध्या तरी अफवा असून, त्याबाबतचे तथ्य अजूनही समोर आलेले नाही. 

मोठी बातमी -  मोबाईल फोन आणि नोटांमुळे पसरतो कोरोना, जाणून घ्या शास्त्रीय कारण...

तापाची लस माझे कोरोनापासूचे संरक्षण करू शकते, अशी अफवा सध्या पसरवली जात आहे. यात काहीही तथ्य नाही. तापाची लस तुमचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण करते, असे आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने म्हटलेले नाही. सध्या अनेक ठिकाणी तापाचे रुग्ण आढळून येतात. फक्‍त त्यांनाच तापापासून बचाव होण्यासाठी तापाची लस घेण्यासाठी डॉक्‍टरांकडून सांगितले जाते. 

कोरोना व्हायरसची प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून, कोविड-19 च्या मदतीने उपचार शक्‍य झाल्याचा दावा करण्यात येत आहे; मात्र यामध्येही तथ्य नसून, कोरोना व्हायरसवर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी अखंड मेहनत घेत आहेत. सुरक्षित आणि परिणामकारक लस बाजारात येण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. 

मोठी बातमी - 'असा' पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...

चीनने कोरोना व्हायरस मुद्दामहून तयार केला असून, जगाला तोटा पोहोचवण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी एक अफवा पसरवली जात आहे; मात्र यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे. वेळोवेळी व्हायरस बदलू शकतात. कधी कधी डुक्‍कर, वटवाघुळ किंवा इतर पक्ष्यांमध्ये विषाणू तयार होऊ शकतो. त्यानंतर या प्राण्यांमधून तो मानवामध्ये येतो. या प्रकारे कोरोना व्हायरस तयार झाल्याची प्राथमिक शक्‍यता आहे. 

fear of corona virus rumors and truth read full story

loading image
go to top