esakal | कोरोनासाठी 'मास्क' ऐवजी 'रुमाल' वापरावा का ? उत्तर आहे...
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनासाठी 'मास्क' ऐवजी 'रुमाल' वापरावा का ? उत्तर आहे...

कोरोनासाठी 'मास्क' ऐवजी 'रुमाल' वापरावा का ? उत्तर आहे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरस जगात पसरत चालला आहे. भारतातही आता कोरोनाचे तब्बल २९ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देशासह राज्यातही यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राज्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कऐवजी स्वच्छ रुमालाचा वापर केला पाहिजे असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येतंय. 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी N-95 मास्क उपयुक्त आहे असं सतत सांगण्यात येतंय. मात्र हे मास्क बाजारात हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नाही. ज्या विक्रेत्यांकडे हे मास्क आहेत ते मास्कला न परवडणाऱ्या किमतीत विकत आहेत. त्यामुळे ३०-४० रुपयांचं हे मास्क तब्बल २५०-३०० रुयायांना विकलं जात आहे. सामान्य नागरिकांना ते परवडण्यासारखं नाहीये. म्हणून राज्य सरकारकडून आता नागरिकांना स्वच्छ रुमाल वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. 

मोठी बातमी -  आयुष्याची परीक्षा देता देता अमृता देतेय दहावीची परीक्षा; अमृता तुला सलाम !

नागरिकांनी घाबरू नये, राज्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. तसंच राज्यातली यंत्रणा कोरोनाबद्दल सजग आणि जागरूक आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिलीये.

काय म्हणाले आरोग्य मंत्री: 

  • राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलत आहे. 
  • सर्व रुग्णालयांमद्धे यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
  • या वॉर्डमध्ये १० सुसज्ज बेड ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 
  • कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्या लोकांवर सायबर क्राइम विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. 
  • मुंबईत येणाऱ्या ६५ हजार १२१ प्रवाशांचं विमानतळावर थर्मल स्कॅनींग करण्यात आलं आहे.
  • यात ४०१ प्रवासी कोरोना बाधित देशांचे होते त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 
  • १५२ लोकांची पुन्हा चाचणी करण्यात आली. 
  • त्यातील १४९ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. 
  • उर्वरित लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. 

असे काही महत्वाचे मुद्दे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून मांडण्यात आले आहेत.

मोठी बातमी - कोरोनाची दहशत अफवा आणि सत्य.... 

केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनीही मिळून कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पावलं उचलली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलंय. 

Use clean handkerchiefs instead of N-95 masks said state Health minister   

loading image