
डहाणू : आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या पूर्वसंध्येला मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी गर्भवतींकरिता राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष दिला जात नाही. त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचा दावा करत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कष्टकरी संघटनेमार्फत डहाणू पंचायत समितीवर महिलांनी शुक्रवारी मोर्चा नेऊन निषेध व्यक्त केला.