मनसुख हिरेन यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आला समोर, वाचा काय आहे अहवालात

मनसुख हिरेन यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आला समोर, वाचा काय आहे अहवालात

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मालकाच्या रहस्यमय मृत्यूने  खळबळ उडाली आहे. या स्कॉर्पिओचे  मालक मनसुख हिरेन गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. सकाळपर्यंत मनसुख परतले नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली. दरम्यान शुक्रवारी सकाळी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला मुंब्रा रेतीबंदर खाडीत एक मृतदेह मिळाला. तो मृतदेह या त्याच स्कॉर्पियो कार मालक मनसुख हिरेन यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. 

गुरुवारी नेमके काय झाले

गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मनसुख हिरेन बेपत्ता झाले. गुरुवारी त्यांच्या क्लासिक मोटर्समध्ये काम करणारे ठेकेदार, दुकानातील कामगार यांना नेहमीप्रमाणे मनसुख हिरेन भेटले. कामाचे पैसे आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार देऊन ते दुकानाच्या बाहेर पडले. रात्री ठाण्यात घरी आले होते. त्यानंतर त्यांना कांदिवली क्राईम ब्रांच मधून तावडे तावडे यांचा फोन आल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं. त्यानंतर मनसुख हे बेपत्ताच होते. 

माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत

दरम्यान याबाबत आता सखोल चौकशीची मागणी मनसुख यांच्या पत्नी यांनी केली आहे. माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान मनसुख यांच्या कुटुंबीयांनी मनसुख यांचे पोस्टमॉर्टेम रिपोर्ट जोवर येत नाहीत तोवर मनसुख यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं म्हंटलं होते. 

प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आला समोर 

मनसुख हिरेन यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल घेऊन पोलिस मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. मनसुख हिरेन यांचा मृत्यू हा बुडूनच झाल्याचं प्रत्मिक अहवालात नमूद केलं आहे. अविनाश अंबुरे हे अहवाल घेऊन कुटुंबियांच्या भेटीला गेल्याचं आता समजतंय.

preliminary postmortem report of mansukh hiren is ready mansukh died due to drowning 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com