राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने, तांत्रिक पुरस्कार घोषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य मराठी चित्रपट  पुरस्कार घोषित

राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने, तांत्रिक पुरस्कार घोषित

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन मिळावे तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या उत्कर्षाकरिता चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याकलाकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने प्रतिवर्षी मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या वर्षी हा सोहळा मे महिन्यात पार पडार आहे. 57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच सात तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. अंतिम फेरीसाठी पांघरुण, ताजमाल, आनंदी गोपाळ, बाय (Y), बार्डो, प्रवास, मिस यु मिस्टर,बस्ता, स्माईल प्लीज, बाबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता माईघाट, मनफकिरा, झॉलीवूड या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी घोडा, वेगळी वाट, आटपाडी नाईटस् यांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले नव्हते. आता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 89 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून रमेश साळगांवकर, अरुण म्हात्रे, किशू पाल, श्रीरंग आरस, प्रशांत पाताडे, विजय कदम, मनोहर आचरेकर, जयवंत राऊत, प्रदीप पेडणेकर, नंदू वर्दम, प्रकाश जाधव, रमेश मोरे, कुमार सोहनी आणि दिलीप ठाकूर यांनी काम पाहिले.

अंतिम घोषित पारितोषिके : तांत्रिक विभाग व बालकलाकार

अ.क्र. विभाग पारितोषिक प्राप्त नाव चित्रपट

1) उत्कृष्ट कला दिग्दर्शन- श्री. सुनील निगवेकर, श्री. निलेश वाघ (आनंदी गोपाळ)

2) उत्कृष्ट छायालेखन- श्री. करण बी. रावत (पांघरुण)

3) उत्कृष्ट संकलन- श्री. आशिष म्हात्रे, श्रीमती. अपूर्वा मोतीवाले (बस्ता)

4) उत्कृष्ट ध्वनीमुद्रण- श्री. अनुप देव (माईघाट)

5) उत्कृष्ट ध्वनीसंयोजन- श्री. मंदार कमलापूरकर (त्रिज्या)

6) उत्कृष्ट वेशभूषा- श्री. विक्रम फडणीस (स्माईल प्लीज)

7) उत्कृष्ट रंगभूषा- श्रीमती. सानिका गाडगीळ (फत्तेशिकस्त)

8) उत्कृष्ट बालकलाकार- श्री. आर्यन मेघजी (बाबा)

नामनिर्देशन : अ.क्र. विभाग नामनिर्देशन चित्रपट

1. सर्वोत्कृष्ट कथा-

1. बा.भ. बोरकर (पांघरुण)

2. मनीष सिंग (बाबा)

3. पुंडलिक धुमाळ (पेन्शन)

2. उत्कृष्ट पटकथा-

1. नियाज मुजावर (ताजमाल)

2. समीर आशा पाटील (बोन्साय)

3. विक्रम फडणीस व इरावती कर्णिक (स्माईल प्लीज)

3. उत्कृष्ट संवाद-

1. इरावती कर्णिक (आनंदी गोपाळ)

2. श्वेता पेंडसे (बार्डो)

3. नियाज मुजावर (ताजमाल)

4. उत्कृष्ट गीते-

1.गीत-आभाळासंग मातीचं नांदणं- संजय कृष्णाजी पाटील (हिरकणी)

2.गीत- रान पेटलं- श्वेता पेंडसे (बार्डो)

3.गीत- ही अनोखी गाठ-वैभव जोशी (पांघरुण)

5. उत्कृष्ट संगीत-

1. ऋषिकेश-जसराज- सौरभ (आनंदी गोपाळ)

2. रोहन रोहन (स्माईल प्लीज)

3. अमित राज (हिरकणी)

6. उत्कृष्ट पार्श्वसंगीत-

1. सौरभ भालेराव (आनंदी गोपाळ)

2. प्रफुल्ल स्वप्नील (स्माईल प्लीज)

3. हितेश मोडक (पांघरुण)

7. उत्कृष्ट पार्श्वगायक-

1. गीत-मम पाऊली- ऋषिकेश रानडे (आनंदी गोपाळ)

2. गीत-येशील तू- सोनू निगम (मिस यु मिस्टर)

3. गीत- गार गार थेटरात- जसराज जोशी (गर्लफ्रेंड)

8. उत्कृष्ट पार्श्वगायिका

1. गीत- मम पाऊली- आनंदी जोशी (आनंदी गोपाळ)

2. गीत- रान पेटलं- सावनी रविंद्र (बार्डो)

3. गीत- आभाळसंग मातीचं नांदन- मधुरा कुंभार (हिरकणी)

9. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक-

1. लव स्टोरी- राहुल - संजीव (गर्लफ्रेंड)

2. परिणीती आसमंती- चिन्नी प्रकाश (वन्स मोअर)

3. राज्याभिषेक गीत- सुभाष नकाशे (हिरकणी)

10. उत्कृष्ट अभिनेता-

1. कैलास वाघमारे (घोडा)

2. दीपक डोब्रियाल (बाबा)

3. ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)

11. उत्कष्ट अभिनेत्री -

1. भाग्यश्री मिलिंद (आनंदी गोपाळ)

2. सोनाली कुलकर्णी (पेन्शन)

3. मृण्मयी देशपांडे (मिस यु मिस्टर)

12. उत्कृष्ट विनोदी अभिनेता-

1. पार्थ भालेराव (बस्ता)

2. शिफारस नाही

3) शिफारस नाही

13. सहाय्यक अभिनेता -

1. सुहास पळशीकर (बस्ता)

2. रोहित फाळके (पांघरुण)

3. संजय खापरे (ताजमाल)

14. सहाय्यक अभिनेत्री-

1. किरण खोजे (ताजमाल)

2. नंदिता पाटकर (बाबा)

3. अंजली पाटील (मन फकिरा)

15. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता-

1. दीपक काळे (झॉलीवूड)

2. शिफारस नाही

3. शिफारस नाही

16. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-

1. अक्षया गुरव (रिवणावायली)

2. अश्विनी लाडेकर (झॉलीवूड)

3. अंकिता लांडे (गर्ल्स)

अंतिम फेरीकरीता प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती

1. माईघाट (अल्केमी व्हिजन)

2. मनफकिरा (एस.एन.प्रोडक्शन)

3. झॉलीवूड (विशबेरी ऑनलॉईन सर्विस प्रा.लि.)

प्रथम पदार्पण दिग्दर्शन

1. घोडा (टी.महेश)

2. वेगळी वाट (अच्युत नारायण)

3. आटपाडी नाईटस् (नितीन सुपेकर)

Web Title: Preliminary Round Of State Marathi Film Awards Nominations Technical Awards Announced

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top