
Navratri 2025
ESakal
मुंबई : यंदा २२ सप्टेंबरला दुर्गादेवीची घटस्थापना होणार आहे. मुंबईत घटस्थापनेसाठीची लगबग आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढली असून अनेक जण घरीही देवीची स्थापना करू लागल्याचे मुर्तीकार सांगताहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावेळी देवीच्या मुर्त्यांची मागणी २० ते २५ टक्कांनी वाढली आहे. पर्यावरण पूरक मुर्तीला फारशी मागणी नसल्याचे मुर्तीकारांनी सांगीतले.