मांडवा ते भाऊचा धक्का रो-रो बोट सेवा मुहूर्त गाठणार का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

अलिबाग : बहुप्रतिक्षित मांडवा ते भाऊचा धक्कादरम्यानच्या रो-रो बोटच्या चाचण्या अद्याप संपत नाहीत. आतापर्यंत उद्‌घाटनाच्या दिलेल्या अनेक तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्याने दिलेल्या उद्‌घाटनाच्या तारखेचा मुहूर्त गाठण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून 15 मार्चची तारीख देण्यात आली आहे. यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून जय्यत तयारी सुरू आहे.

अलिबाग : बहुप्रतिक्षित मांडवा ते भाऊचा धक्कादरम्यानच्या रो-रो बोटच्या चाचण्या अद्याप संपत नाहीत. आतापर्यंत उद्‌घाटनाच्या दिलेल्या अनेक तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्याने दिलेल्या उद्‌घाटनाच्या तारखेचा मुहूर्त गाठण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून 15 मार्चची तारीख देण्यात आली आहे. यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून जय्यत तयारी सुरू आहे.

मोठी बातमी : कोरोनाच्‍या धास्‍तीमुळे मुंबई-पुणे प्रवास मंदावला 

भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान रो-रो जलवाहतूक सेवेला 15 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी बोटीच्या चाचण्या घेण्यात आल्या. बुधवारी दुपारी भाऊचा धक्का येथून दहा गाड्या घेऊन ही बोट मांडवा येथे दाखल झाली. 50 मिनिटांचा प्रवास करून बोट मांडवा येथील टर्मिनलवर दाखल झाली.

या वेळी मेरिटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, कोकण विभाग पोलिस निरीक्षक उपस्थित होते. मांडवा टर्मिनलवर बोट थांबविण्यात गाळाची समस्या येईल, अशी अपेक्षा होती, मात्र पहिली चाचणी व्यवस्थित पार पडली. पण दुसऱ्या चाचणीदरम्यान ही बोट मांडवा टर्मिनलवर धडकली. हा अपघात किरकोळ असला तरी मेरिटाईम बोर्डाच्या मागील पाच वर्षांच्या प्रयत्नांवर पाणी सोडणारा ठरला असता. 

हेही वाचा : मुंबई आणि ठाण्‍यात कोरोनाबाधित आणखी एक रुग्‍ण!

गेल्या दोन वर्षांपासून रो-रो सेवा सुरू करण्यासाठी अनेक तारखा देण्यात आल्या होत्या. कधी बंदरातील गाळ; तर कधी रो-रोच्या तांत्रिक कारणामुळे या तारखा पुढे ढकण्यात आल्या होत्या. नवी रो-रो बोट मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर सर्व प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

आता बोट बंदरात व्यवस्थित लागते किंवा नाही याची चाचणी घेतली जात आहे. गुरुवारीही काही तांत्रिक चाचण्या घेण्यात आल्याची माहिती मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली. उद्‌घाटनासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने या सर्व चाचण्या पूर्ण करणे आवश्‍यक आहेत. तरीही बोट जेट्टीला व्यवस्थितपणे लावण्यात अडचणी येत आहेत. जेट्टीला बोट व्यवस्थित लागावी यासाठी बंदरातील गाळ काढून खोली 3.50 मीटरपर्यंत वाढवण्यात आली. 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून 15 मार्च ही तारीख देण्यात आली आहे. मात्र हा कार्यक्रमाची वेळ अद्याप ठरविण्यात आलेली नाही. यासाठी चर्चा सुरू आहे. त्याच वेळेस बोटीच्या चाचण्यादेखील सुरू आहेत 
- प्रदीप बडिये, व्यवस्थापकीय अधिकारी, नियोजन विभाग, एमएमबी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations for Ro-Ro Boat Service Launched