चित्रपटांच्या पायरसीला डिजिटल सुरक्षेमुळे आळा - राजेश रामचंद्रन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

मुंबई - सेन्सॉर बोर्डाला पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या कॉपीबद्दल आता पुरेशी सावधगिरी बाळगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाला पाठवण्यात येणाऱ्या कॉपीच चित्रपट प्रदर्शित होण्याआधी व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले होते; पण आता मंडळानेही तंत्रज्ञानातील पुरेशी सावधगिरी बाळगण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे हे प्रकार कमी होतील. मंडळाकडे जाणारी कॉपी आता डिजिटल सुरक्षिततेचा वापर करून पाठवण्यात येत आहे. यातून पायरसीला आळा बसेल, असे "क्‍युबबॉक्‍स'चे संचालक राजेश रामचंद्रन यांनी सांगितले.

"मुंबई आयआयटी टेकफेस्ट'मधील व्याख्यानात ते बोलत होते. चित्रपटगृहांना प्रत्येक चित्रपटाची हार्ड डिस्क देण्यात येते. त्यातील माहितीचा साठा गिगाबाइटमध्ये असतो. त्यामुळेच प्रत्येक हार्ड डिस्कला सुरक्षिततेसाठी एक डिजिटल स्वरूपातील चावी (युनिक की) असते. सेन्सॉरसाठी पाठवण्यात येणाऱ्या कॉपी मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारची डिजिटल सावधगिरी न बाळगता पाठवण्यात येत होत्या. त्यामुळे आता डिजिटल सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कॉपीसाठीही "युनिक की' देण्याचे पाऊल बोर्डाने उचलले आहे.

प्रत्येक चित्रपटगृहाचे ट्रॅकिंग
एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पायरेटेड कॉपी बाहेर पडल्याचे आढळते; पण आता चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या हार्ड डिस्कमध्ये छुपा "वॉटरमार्क' आहे. त्यामुळे कोणत्या चित्रपटगृहात मोबाइल कॅमेरा किंवा डिजिटल कॅमेऱ्याचा वापर करून चित्रपटाची पायरसी झाली हे कळणे शक्‍य झाले आहे. अशी प्रकरणे आणि चित्रपटगृहांचे "ट्रॅकिंग वॉटरमार्क'मुळे करणे सहज शक्‍य झाले आहे, असे रामचंद्रन म्हणाले.

Web Title: prevent digital security for movie piracy