Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार आज हिरवा झेंडा!

वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस आरक्षण आजपासून सुरू!
Prime Minister Narendra Modi will show green flag to Vande Bharat Express Superfast Express Reservation Starts Today
Prime Minister Narendra Modi will show green flag to Vande Bharat Express Superfast Express Reservation Starts Todayesakal

मुंबई : सीएसएमटी ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान सेमी हाय स्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करणार आहे. या उदघाटन कार्यक्रमासाठी सीएसएमटी स्थानक सज्ज झाले असून रेल्वेचीही पूर्ण तयारी झाली आहे. आजपासून सर्वसामान्य प्रवाशांना वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे तिकीट आरक्षित करतात येणार आहे.

रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून देशभरात वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहे. सध्या आठ मार्गावर सेमी हाय स्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस धावत आहे. प्रथमच मुंबई ते सोलापूर आणि मुंबई आणि साईनगर शिर्डी दरम्यान घाटातुन धावणाऱ्या या पहिल्याच वंदे भारत रेल्वे गाड्या असणार आहे.

मध्य रेल्वे मुंबई विभागात कसारा आणि लोणावळा दोन घाटातून रेल्वे गाडयांना पुश- पुलासाठी अतिरिक्त इंजिन जोडावे लागतात. त्यामुळे मेल- एक्सप्रेसच्या गाडयांना वेळ सुद्धा वाया जातोय अशा परिस्थिती विना पुश- पुलासाठी अतिरिक्त इंजिन न जोडता वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस घाटमाथ्यावरून चालवणे कठीण होते.

परंतु, रेल्वे मंत्रालयाने यावर तोड काढत वंदे भारत २.० प्रकारातील या रेल्वेगाडीची इंजिनची क्षमता वाढली आहेत तसेच डब्याच्या प्रत्येक चाकाला पार्किंग ब्रेक रेल्वेने विशेष खबरदारी घेतली आहे.

या गाडीची ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी सर्वसाधारण मार्गावर १००-१२० किमी तर घाट परिसरात ताशी ५५ किमी वेगाने चालवण्यात येणार आहे. या गाडीला लोकल ट्रेनच्या तुलनेत तिपटीहून अधिक क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटार लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाडीला ३६०० हॉर्स पॉवर एवढी ताकद मिळणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकान्याने दिली.

उशिरापर्यंत काही कामे सुरु -

वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.परंतु गुरुवारी शेवटच्या उशिरापर्यंत वंदे भारतमध्ये काही कामे सुरु होते. पंतप्रधान येणार असल्याने या गाडीची मोठी चर्चा आहे. आज महाव्यवस्थापकांनी या गाडीच्या वैशिष्ट्यांबद्दल माध्यमाना माहिती दिली आहेत.

वंदे भारतमुळे प्रवाशांचे हाल

वंदे भारताच्या उदघाटनामुळे लांबपल्याच्या गाडयांना मोठा फटका बसला आहे. या गाड्या चार ते पाच उशिराने धावत आहेत त्यामुळे प्रवाशांना विमानाने प्रवास करावा लागला तर काही जणांना ताटकळत बसावे लागले.

दोन हजारहुन अधिक फॊजफ़ाटा

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज झाले असून सीएएमटी रेल्वे स्थानक परिसरात दोन हजारांहून अधिक फोजफाटा तैनात केला होता. यामध्ये मुंबईसह ग्रामीण भागातील पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.

सीएसएमटी ते सोलापूर

ठळक वैशिष्ट्ये

- ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन असेल.

- सीएसएमटी आणि सोलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढेल.

- व्यापारी राजधानीला महाराष्ट्रातील कापड आणि हुतात्मा शहरांशी जोडणार.

- सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्रांशी जलद कनेक्टिव्हिटी होईल.

- विद्यमान सुपरफास्ट ट्रेनला ७ तास ५५ मिनिटे लागतात तर वंदे भारतला ६ तास ३० मिनिटे लागतील अशा प्रकारे एक तास ३० मिनिटांचा प्रवास वेळ वाचेल.

- वर्ल्ड हेरिटेजला तीर्थक्षेत्र, टेक्सटाईल हबशी जोडणार

- पर्यटन स्थळे आणि शैक्षणिक हब पुणे यांना चालना मिळेल

- भोर घाटातील खंडाळा - लोणावळा घाट विभागात बँकर इंजिनशिवाय ३७ मीटरमध्ये १ मीटर घाट चढणारी पहिली वंदे भारत ट्रेन.

- मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस वैशिष्ट्ये

- ही देशातील १०वी वंदे भारत ट्रेन असेल

- सीएसएमटी आणि साईनगर शिर्डी दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढेल.

- महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांना जसे नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डीला व्यापारी राजधानीला जोडणार.

- महाराष्ट्रात दोन आंतरराज्यीय आणि दोन राज्यांतर्गत गाड्यांसह चार वंदे भारत गाड्या असतील

- जागतिक वारसा ते तीर्थक्षेत्राशी जोडणार.

- थळ घाट म्हणजे कसारा घाट बँकर इंजिनशिवाय ३७ मीटरमध्ये १ मीटर घाट चढणारी पहिली वंदे भारत ट्रेन.

वंदे भारत एक्सप्रेस एका नजरेत

- स्वदेशी तयार, सेमी-हाय स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ट्रेन सेट

- १६० किमी प्रतितास वेग गाठण्याची वेळ १४० सेकंद आहे

- प्रवाशांसाठी ३.३(राइडिंग इंडेक्स) सह आरामशीर उत्तम प्रवास.

- स्लाइडिंग फूटस्टेप्ससह स्वयंचलित प्लग दरवाजे आणि टच फ्री स्लाइडिंग दरवाजे

- एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्व्हिंग सीट्स

- वातानुकूलित हवेच्या आवाजरहित आणि समान वितरणासाठी विशेष वातानुकूलित डक्ट

- दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष शौचालय

- टच-फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट

- ब्रेल अक्षरांमध्ये सीट क्रमांकासह आसन हँडल प्रदान केले आहेत.

- प्रत्येक कोचमध्ये ३२" प्रवासी माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टम

- प्रत्येक कोचमध्ये आपत्कालीन प्रकाश व्यवस्था

- प्लॅटफॉर्म साइड ४ कॅमेरे ज्यात डब्याच्या बाहेर मागील दृश्य चित्रित करणारे कॅमेरे.

- प्रत्येक कोचमध्ये ४ आपत्कालीन खिडक्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com