

Narendra Modi Tweet For Sanjay Raut
ESakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी संजय राऊत यांच्या सोशल मीडिया पोस्टला टॅग करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली.