पॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुंबई  - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सुजित ऊर्फ पप्पू कऱ्हाडे (35) असे त्याचे नाव आहे.

सुजित कऱ्हाडे याने 2011 मध्ये ठाण्यात शिवा रघुनाथ जैस्वाल या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या केली होती. या प्रकरणी सुजितसह त्याचे भाऊ रितेश व सुनील कऱ्हाडे यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 2012 मध्ये न्यायालयाने या तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्याला कोल्हापूर मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले होते. त्याला 6 ऑक्‍टोबर 2016 रोजी 30 दिवसांचा पॅरोल मिळाला; ही मुदत संपल्यावर तो परत हजर झाला नव्हता. या काळात त्याने पुण्यातील भोसरी परिसरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तो पुणे परिसरात लपून बसला होता. दोन वर्षे उलटल्यावरही तो सापडत नसल्यामुळे गुन्हे शाखेच्या कक्ष 7 मधील पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. तो भोसरी येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

Web Title: Prisoner Girl Rape Crime