खासगी कंपन्यांद्वारे हजला जाणाऱ्यांना सर्व सोयी

Hajj
Hajj

मुंबई - हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक असल्याने खासगी पर्यटन कंपन्यांद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंनाही सरकारी सोयीसुविधा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील बैठकीत दिले. मुंबई आणि नागपूर विमानतळावर राज्यातील हज यात्रेकरूंची सोय करण्यात आली आहे.

बकरी ईदच्या काळातील सोयीसुविधांचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्‍यक सोयीसुविधा पुरवाव्यात. तसेच पोलिस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्‍यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रित सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे शांततेत साजरा होईल असे नियोजन करावे, अशा सूचना फडणवीस यांनी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com