मुंबई महापालिकेच्या लाँड्रीचे खासगीकरण!

पावणेदोन कोटी रुपये खर्च करणार
Mumbai
Mumbaisakal

मुंबई : महापालिकेच्या लाँड्रीचे काम कमी करून खासगी लाँड्रीचे काम वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील (सायन) रुग्णांचे आणि डॉक्टरांच्या कपड्यांपैकी ७० टक्के कपडे आता खासगी लाँड्रीत धुतले जाणार आहेत.

लोकमान्य टिळक रुग्णालयातील ५० टक्के कपडे खासगी लाँड्रीत; तर ५० टक्के कपडे पालिकेच्या लाँड्रीत धुतले जात होते. खासगी लाँड्रीशी असलेला करार या महिन्यात संपत आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा मागवल्या होत्या; मात्र आता ७० टक्के कपडे खासगी लाँड्रीत धुण्याची सूचना पालिकेने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे. प्रत्येक कपड्यासाठी ८ रुपये ६० पैसे दराने हे कंत्राट तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका एक कोटी ७४ लाख रुपये खर्च करणार आहे.

शीव रुग्णालयातील ७० टक्के कपडे; तर केईएम रुग्णालयातील ८० टक्के कपडे खासगी लाँड्रीत पाठवण्यात येणार आहेत; तर नायर, कस्तुरबा आणि पालिकेच्या क्षयरोग रुग्णालयातील सर्व कपडे गेल्या आठ वर्षांपासून खासगी लाँड्रीत पाठवले जात आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वच रुग्णालयांतील कपडे खासगी लाँड्रीत धुण्यासाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या कामाचे खासगीकरणच होणार असल्याची चर्चा आहे.

पूर्वीपेक्षा दर कमी

लाँड्रीचा हा कंत्राटदार पूर्वी शीव रुग्णालयातील कपडे धुऊन देत होता. पहिल्या दोन वर्षांसाठी नऊ रुपये आणि तिसऱ्या वर्षांसाठी १० रुपये प्रतिनग या दराने त्याने कपडे धुऊन दिले होते; मात्र आता नव्या कंत्राटात ८ रुपये ६० पैसे दराने कपडे धुऊन देणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com