लाखोंची उलाढाल! उटावली गावात महिला समूहाकडून बांबूपासून शोभिवंत वस्तूंची निर्मिती

अमोल सांबरे
Friday, 30 October 2020

उटावली गावात नैसर्गिक वस्तू निर्मिती बांबू हस्तकला महिला समूह नावाने महिला व पुरुष अशा 30 जणांचा एक समूह सध्या बांबू कलेत रमलेला आहे.

विक्रमगड : मोबाईल व चिनी बनावटीच्या खेळण्यांच्या दुनियेत रमलेल्या मुलांना पारंपरिक खेळण्यांचा पूर्णपणे विसर पडला आहे; मात्र उटावली येथील बांबूपासून शोभिवंत, खेळांच्या वस्तू बनवणाऱ्या कलाकारांनी लाकडी खेळण्यांवर विशेष लक्ष दिले आहे. रेल्वे इंजिन, बदक, गाडी आशा विविध खेळण्यांसोबत पूर्णपणे नैसर्गिक व बांबूपासून तयार केलेले आकाशकंदील, फुलदाण्या व अन्य 35 प्रकारच्या वस्तू या कलाकारांकडून तयार करण्यात आल्या आहेत. या वस्तू विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे येथील महिलांनी सांगितले. 

नक्की वाचा : मुंबईतील भेंडीबाजारात फ्रान्स अध्यक्षांचे पोस्टर रस्त्यावर चिकटवून निषेध

उटावली गावात नैसर्गिक वस्तू निर्मिती बांबू हस्तकला महिला समूह नावाने महिला व पुरुष अशा 30 जणांचा एक समूह सध्या बांबू कलेत रमलेला आहे. अतिशय सुबक व बारीक काम, उत्तम पद्धतीचे बांबू, रंगसंगती व नक्षीकाम असलेले आकाशकंदील, पाणीबॉटल, चहाकप, मोबाईल स्टॅण्ड, फुलदाणी, चेंडू, मोबाईल स्पीकर स्टॅण्ड, फूड स्टॅण्ड, तारपा शो-पीस अशा 35 प्रकारच्या वस्तू येथे तयार केल्या जात आहेत. सगळ्या वस्तू पारंपरिक हत्यारांच्या साह्याने बनवल्या जात असल्या तरी येत्या काळात आधुनिक हत्यारे व यंत्र वापरून आपल्या या कलेला व्यावसायिक स्वरूप देण्याचा या कलाकारांचा मानस आहे. 

हे ही वाचा : ऐतिहासिक क्षणापर्यंत आम्ही आपल्यासोबत! शिंदे, भुजबळ यांची सीमावर्तीयांना भावनिक साद

केशव सृष्टी संस्थेने प्रशिक्षण देऊन आम्हाला कलेचा मार्ग दाखवला. आता आम्ही पूर्ण ताकदीने हा व्यवसाय घर व शेती सांभाळून करीत आहोत. आम्हाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्यात या कलेने सहकार्य केले असून पुढील काळात सुबक व वेगळ्या पद्धतीच्या वस्तू बनवून गरुडझेप घेण्याचा आमचा मानस आहे. 
- रेश्‍मा महाले, अध्यक्ष, बांबू हस्तकला समूह 

 

आकाशकंदिलाला मागणी- 
मेस बांबू, मानवेर बांबू आणि कासट अशा तीन जातींचे उत्तम बांबू या वस्तूंसाठी नैसर्गिक प्रक्रिया करून वापरले जातात. कलाकार रात्री व आराम करण्याच्या वेळेत एकत्र येऊन सुबक आकाशकंदील तयार करीत आहेत. सात वेगवेगळ्या पद्धतीच्या आकाशकंदिलांची 400 ते 800 पर्यंत किंमत आहे. 100 ते 150 आकाशकंदिलांची विक्री झाली असून दिवाळी जवळ आल्याने आकाशकंदिलाला मागणी आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Production of decorative items from bamboo by a group of women in Utavali village


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Production of decorative items from bamboo by a group of women in Utavali village