अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे करणारा आदर्श शिक्षक, प्रा आनंद देवडेकर

chetna-collage
chetna-collage

मुंबई : प्रा.आनंद देवडेकर म्हणजे अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे करणारा आदर्श शिक्षक व सद्धम्म पत्रिकेच्या माध्यमातून धम्मकारण समर्थपणे पेलणारा आदर्श संपादक आहेत, असे गौरवोद्गार चेतना शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ नेते अॅड. प्रेमानंद रूपवते उर्फ 'बाबूजी 'यांनी वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात बोलताना काढले. चेतना महाविद्यालयतील प्रा. आनंद देवडेकर यांच्या सेवापूर्ति निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेतना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीदत्त हळदणकर हे होते. 

अॅड. प्रेमानंद रूपवते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, स्वतः आनंदी राहून दुसर्‍याला आनंद वाटणारे प्रा. देवडेकर हे एक आनंदी प्रवासी आहेत. म्हणूनच निवृत्तीनंतरचा प्रवास करताना खरा चेहरा लपवून खोटा मुखवटा धारण करणार्‍यांनी देशात निर्माण केलेल्या अपूर्व राजकीय परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी पुढील प्रवास करावा. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ही राजकीय परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. याचे भान आपण सार्‍यांनीच ठेवायला हवे. 

चेतना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीदत्त हळदणकर म्हणाले की, प्रा. आनंद देवडेकर हे शिक्षकांचे प्रश्न मांडणारे एक निर्भीड व्यक्तीमत्व आहे. नियमानुसार ते सेवानिवृत्त होत असले तरी अशा विद्यार्थीप्रिय शिक्षकाशी संस्थेचा सबंध तुटणार नाही.  चेतना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेशचंद्र जोशी या प्रसंगी बोलताना म्हणाले की, प्रा आनंद देवडेकर हे एक कल्पक व प्रयोगशील शिक्षक आहेत. कोणतंही काम ते आपल्या मनासारखंच करून घेतात असा माझा अनुभव आहे. 

चेतना महाविद्यालयतील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे कोषाध्यक्ष, प्रा. कैलाश लांडगे हे आपल्या भाषणात म्हणाले की, अध्यासनाचे संस्थापक असलेले प्रा. आनंद देवडेकर हे आमचे थिंकटँक आहेत.

चेतना महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. एस. एस. पाटील, चेतना मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटच्या डायरेक्टर डॉ. मधुमीता पाटील, बी. ए. आर. सी.चे माजी मुख्य सुरक्षा अधिकारी, विजयकुमार मोरे,कुणबी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. विठ्ठल चिविलकर, कुणबी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विलास कांबळी, उपप्राचार्य प्रा. गिरीश साळवे, पर्यवेक्षक प्रा. हेमंत कांबळे, प्रा. स्मिता नाईकनवरे, गझलकार भागवत बनसोडे, प्रा. गजानन डोंगरे, माजी उपप्राचार्य प्रा. पी. एस. बिरारे, माजी उपप्राचार्य प्रा. डी. सी. त्रिवेदी,  आनंद गांगण, प्रा. प्रिति पाटील, प्रा. किरण राजभोज, प्रा. संभाजी भांड, डॉ संजय आघाव, प्रा. राम प्रजापती,प्रा. अल्का पेंदाम, प्रा. रुक्साना शेख, प्रा. सतीश ठाकरे, पत्रकार दिनेश चिलप मराठे, अमित जाधव इ. वक्त्यांची प्रा. देवडेकर यांचा गुणगौरव करणारी भाषणे झाली.  कुसुमताई चौधरी महिला कल्याणीच्या अध्यक्ष प्रा. स्नेहजाताई रुपवते, आदरणीय माई रुपवते,मर्चंट नेव्हीचे चिफ इंजिनिअर सुहास जाधव, डॉ. नितिन रिंढे, डॉ. सुरेंद्र जाधव, प्रा विजय फुलकर प्रा. ज्योती पवार, प्रा. मनोहर बोरकर, प्रतिभा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुमेध जाधव,विवेक साळवी, संतोष कांबळे, कुणबी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय करंबे, मुंबई विद्यापीठाचे माजी सहायक ग्रंथपाल शंकर खरात, अॅड. सुरेश घमरे, अॅड. डी. बी. कांबळे, राहुल कांबळे, राजा चिंचवलकर, प्रकाश कांबळे प्रमोद जाधव, वर्षाराणी जाधव इ.च्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. चंद्रकांत चिकणे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com