

Professor Recruitment
ESakal
मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समधून शोधनिबंध प्रकाशित झाल्याची अट ठेवण्यात आली आहे. या जाचक अटीमुळे ही भरती प्रक्रियाच खोळंबणार आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आदी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांना या अटीचा मोठा फटका बसणार असून ते भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.