
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज म्हणजेच शनिवारी, देशभरात लाखो लोक योग करत आहेत. शैक्षणिक, सरकारी आणि गैर-सरकारी संस्था विविध ठिकाणी सामूहिक योग कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्रातही सामान्य लोकांसह, नेते, अभिनेते आणि योगी योग दिन साजरा करत आहेत. आज सकाळी ६:३० वाजता, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानातील पौराणिक कान्हेरी गुहांमध्ये योगाभ्यास केला.