संरक्षण सिद्धतेमुळेच देशाची प्रगती - भूषण गोखले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

ठाणे - शांतता आणि संरक्षण सिद्धता असल्यानेच भारताची प्रगती होत आहे; परंतु राजकारण आणि संरक्षण दलात समन्वय आवश्‍यक आहे, असे स्पष्ट मत एअर मार्शल भूषण गोखले यांनी केले. 29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनातील "भारताची संरक्षण सिद्धता' या विषयावरील व्याख्यानात शनिवारी ते बोलत होते. या वेळी कमांडर सुबोध पुरोहित यांनीही भारताच्या संरक्षण सिद्धतेबाबत मते व्यक्त केली.

संरक्षण दलाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजे, असे सांगून एअर मार्शल भूषण गोखले यांनी यशवंतराव चव्हाण यांनी 1965 मधील युद्धाच्या वेळी संरक्षण दलाला निर्णय स्वातंत्र्य दिले होते, असे सांगितले. कमांडर सुबोध पुरोहीत यांनी नौदलाची माहिती देताना नौदल हे दोन देशांतील मैत्रिपूर्ण संबंध चांगले टिकवू शकतात, असे स्पष्ट करून नौदलातील विविध नौका, बोटींविषयी माहिती दिली. पाकिस्तानने सागरी मार्गाने हल्ला केल्यास आपण त्या देशापेक्षा युद्धनौकांच्या बाबतीत बलाढ्य आहोत, असेही पुरोहित म्हणाले.

...म्हणून पाक अण्वस्त्रधारी
युद्धशास्त्राच्या उपेक्षेमुळे आणि गांधी, नेहरू यांनी पाकिस्तानबाबत वेळोवेळी घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळे तो देश अण्वस्त्रधारी झाला, असे मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांनी परिसंवादात मांडले.

Web Title: Progress of the country due to protectionism