
मुंबई : महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमुळे व्यापारी गाळे, व्यावसायिक जागा तसेच काही निवासी बांधकामे बाधित होत आहेत. यामुळे प्रकल्पबाधितांकडून व्यापारी गाळ्यांच्या बदल्यात निवासी घरे मिळावीत, अशी मागणी होत होती. महापालिकेने २००९ मध्ये याबाबत धोरण आखले होते; मात्र ते कालबाह्य झाल्याने आता सुधारित धोरण जाहीर करण्यात आले आहे.