'बढतीमधील आरक्षण भटके, ओबीसींनाही द्या'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने बढतीमधील आरक्षण कायम ठेवले असले, तरी घटना दुरुस्ती करून बढतीतील आरक्षणामध्ये "एससी', "एसटी'सोबत भटके विमुक्त, तसेच ओबीसींचाही समावेश करावा, अशी मागणी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

राठोड यांनी सांगितले, की एससी-एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बढतीमधील आरक्षणांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. केंद्र सरकारच्या मंत्री परिषदेच्या गटांनी राज्य आणि केंद्रामध्ये एससी, एसटी वर्गाला बढतीमध्ये आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र या एकमेव राज्यात भटक्‍या-विमुक्तांनाही बढतीमध्ये आरक्षण देण्यात येत होते. ते अबाधित राहावे, यासाठी घटना दुरुस्तीमध्ये एससी, एसटीबरोबर भटके विमुक्त, तसेच ओबीसींचाही समावेश व्हावा, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.

Web Title: promotion reservation OBC haribhau rathod