मालमत्ता विभागाची कार्यतत्परता गेली कुठे? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांनी मालमत्ता कर भरला नाही तर त्यांची मालमत्ता पालिकेचे कर्मचारी तातडीने सील करून कार्यतत्परता दाखवतात; मात्र ही कार्यतत्परता पालिकेच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांकडून कराची वसुली करतेवेळी दाखवली जात नसल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात या गाळेधारकांकडून पालिकेच्या मालमत्ता विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाडे वसूल न केल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत पालिकेचे 289 गाळे भाड्याने दिले आहेत. या गाळेधारकांकडून 2013-14 या आर्थिक वर्षात एकूण एक कोटी 10 लाख 33 हजार 229 रुपये भाडे येणे होते; मात्र 289 पैकी केवळ 105 जणांनीच भाडे जमा केले आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाच्या एकूण वसुलीपैकी केवळ 37 टक्के रक्कम जमा असून, 63 टक्के भाडे वसुली थकीत आहे. भाडे थकवणाऱ्यांकडून मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांनी वेळेवर भाडे न घेणे, विलंब शुल्क न आकारणे, सेवा करही लावलेला नाही याबद्दल लेखा विभागाने आपल्या अहवालात कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्याचप्रमाणे भाडे न दिल्याने गाळेधारकांविरोधात पालिकेच्या मालमत्ता विभागाने कोणतीही कायदेशीर कारवाई न केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, 184 गाळेधारकांनी भाडे न दिल्याने आणि मालमत्ता विभागाने भाडेकरूंकडून गाळेही ताब्यात न घेतल्याने महापालिकेचे सुमारे एक कोटी 10 लाख 33 हजार 229 रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Property Department has been working actively