कंगना राणावतविरोधात काँग्रेसकडून हक्कभंगाचा प्रस्ताव, गृहमंत्र्यांनी मांडला निषेध ठराव

कंगना राणावतविरोधात काँग्रेसकडून हक्कभंगाचा प्रस्ताव, गृहमंत्र्यांनी मांडला निषेध ठराव

मुंबईः  आज विधानसभेत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींवर हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतवर काँग्रेसनं विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला आहे.  यासंदर्भात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. 

भाई जगताप यांनी प्रस्तावा दरम्यान म्हटलं की, मुंबई आणि महाराष्ट्र राज्याच्या एका परंपरेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि म्हणूनच महिलेच्या विरोधात हक्कभंग आणत आहे. त्यानंतर २०१६ सालच्या कंगनाच्या ड्रग प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात म्हटलं आहे. मुंबई पोलिसांचा अपमान करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

सोमवारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना राणावतवर कारवाई करावे असे पत्र दिले होते. या पत्रात सरनाईक यांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई करण्याची मागणी केली होती.   त्यांच्या या मागणी करणाऱ्या पत्रावर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा असे आदेश विधानसभा उपाध्यक्षांनी दिले होते. 

महाराष्ट्राची आणि मुंबईची बदनामी करणाऱ्या कंगना राणावतवर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही सरनाईक यांनी केली आहे.  कंगनानं मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत कारवाई करावी, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती.. या पत्रात त्यांनी सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणाचाही तपास करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर आज गृहमंत्र्यांनी कंगना राणावतविरोधात निषेध करणारा ठराव मांडला आहे. मुंबईत परप्रांतीय मुलगी येते नाव कमावते. महाराष्ट्र मुंबईचा अपमान करते आणि असं बेताल आणि खेद जनक वक्तव्य करते. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही, मुंबई पोलिस यांची बदनामी सहन करणार नसल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. 

Proposal of infringement against Kangana Ranaut Home Minister by protest resolution

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com