esakal | राईपर्यंत मेट्रोला स्थानक देण्याचा प्रस्ताव : खासदार राजन विचारे
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

राईपर्यंत मेट्रोला स्थानक देण्याचा प्रस्ताव : खासदार राजन विचारे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : दहिसर (Dahisar) चेकनाक्यावरून भाईंदर (Bhaindar) पश्चिमेला येणाऱ्या मेट्रोचा मार्ग आता आणखी पुढे राई गावापर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे राई गावाच्या आसपासही मेट्रोला स्थानक देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

मिरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामाची पाहणी खासदार राजन विचारे आणि आमदार गीता जैन यांनी केली. या वेळी एमएमआरडीएचे अधिकारी तसेच मिरा भाईंदर पालिकेचे अधिकारीदेखील उपस्थित होते. मेट्रोचा मार्ग याआधी भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ संपणार होता. त्याच्याच पुढे मेट्रोच्या कारशेडसाठी मुर्घा गावाच्या मागच्या बाजूला ७२ एकरची लाळे, जागा निश्चित करण्यात आली आहे. मेट्रो मार्ग मुर्गा गाथा पर्यंत जात असल्यामुळे तो पुढे राई गावापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार गीता जैन यांनी दिली.

हेही वाचा: पूर आला अन् संसार सारा वाहून गेला...

त्यामुळे वाढवण्यात आलेल्या मार्गावर मुर्धा राई या ठिकाणी मेट्रोचे स्थाना असावे, असा प्रस्तावही देण्यात आला अस तो विचाराधीन आहे आणि त्याचे आराख तयार करण्याच्या सूचना देण्यात आल् आहेत, अशी माहिती जैन यांनी दिली. मेट्रोचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पु करण्याची हमी एमएमआरडीएने दिली आहे त्यामुळे येत्या दोन वर्षांत मिरा भाईंदरमध्ये मे घावताना दिसणार आहे.

हेही वाचा: राहू : अंगावर वीज कोसळून मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू

वीजवाहिन्यांचा अडसर दूर

मेट्रो गोल्डन नेस्ट चौकातून भाईंदर पश्चिमेला आणण्यासाठी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचा अडवळा होत. बीजवाहिन्या रस्त्याच्या एका बाजूला स्थलांतर करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी एमएमआरडीए मोनोपोल उभारणार असून त्यावरून या वीजवाहिन्या नेण्यात येणार आहेत. मात्र वीजवाहिन्या स्थलांतर केल्यानंतर त्या रहिवासी इमारतीच्या जवळ येणार असल्याने रहिवाशा स्थलातरला विरोध केला होता. या सर्वांची सुनावणी घेऊन त्यातून मार्ग काढण्यात आला आहे. त्यामुळे वीजवाहिन्या स्थलांतराचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती गीता जैन यांनी दिल

loading image
go to top