संभाजी भिडेंच्या मनुवादी धोरणाचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

टिटवाळा : संत तुकाराम व संत न्यानेश्वर यांच्या पेक्षा मनु श्रेष्ठ आहे, आसा युक्तिवाद करून समस्त हिंदू बांधवांचा जाहीर अपमान करणाऱ्या मनुवादी संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध. अखिल महाराष्ट्र कुणबी समाज प्रतिष्टानचे सचिव भगवान कोर यांनी केला आहे.

संभाजी भिडे यांच्या मनुवादी विचारसरणीमुळे समस्त वारकरी आणि बहुजन समजाचा हा अपमान असून ज्या संतांनी समाज उभारणीचे व सामाजिक जागृतीचे काम केले त्याच संता पेक्षा मनु मोठा म्हणजे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम संभाजी भिडे करतात. आसा आरोप कोर यांनी केला असून जगद्गुरू संत तुकाराम म्हणजे कुणबी समाजाची देवता आहे. त्यांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही, आसे ही भगवान कोर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
 
Web Title: protest against Sambhaji Bhide