
नवी मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीदरम्यान “हिंदुत्ववादी म्हणजे दहशतवादी आणि सनातन म्हणजे दहशतवाद” असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप युवासेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज नवी मुंबई युवासेनेच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.