Ghatkopar News : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ उद्या मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानजनक केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवार दि.23 जानेवारी 2024 रोजी मुंबईत घाटकोपर आणि चेंबुर येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे
आमदार जितेंद्र आव्हाड
आमदार जितेंद्र आव्हाड sakal

घाटकोपर ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानजनक केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवार दि.23 जानेवारी 2024 रोजी मुंबईत घाटकोपर आणि चेंबुर येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहीती रिपाइंचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे आणि मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी माहिती दिली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड हे बोलताना कोणतेही तारतम्य बाळगत नाहीत.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबात बुद्धिभ्रष्ट झालेल्या जितेंद्र आव्हाडानी चुकीचा आरोप केला आहे. न्यायपालिकेत आरक्षण न ठेवून 80 टक्के बहुजनावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय केला असा आरोप जितेंद्र आव्हाड या मतीभ्रष्ट आमदाराने केला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड
Ghatkopar News : घाटकोपरच्या ज्ञानमंदिर शाळेला बेस्ट स्कूल 2024 चा पुरस्कार

वाचाळविर जितेंद्र आव्हाड यांचा तिव्र निषेध करण्यासाठि रिपब्लिकन पक्षाचे वतीने उद्या मंगळवार दि.23 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता घाटकोपर पश्चिम सर्वोदय सिग्नल येथे रिपाइं मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड,घाटकोपर तालुका अध्यक्ष अनिल जाधव,संदेश हाटे यांच्या नेतृत्वात जितेंद्र आव्हाड यांचा तिव्र निषेध करण्यात येणार आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या नेतृत्वात चेबुंर पांजरापोळ येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा तिव्र निषेध करण्यात येणार आहे. अशी माहिती रिपाइंचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com