
चोर बाजार परिसरात छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसयिकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून चोरबाजार परिसरात छोटे व्यवसाय करणाऱ्यांना हटवण्यात येत आहे. चोर बाजार परिसरात छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसयिकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
चोरबाजार परिसरात गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. या विरोधात आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निवासस्थानाबाहेर या सर्व व्यवसायिकांनी आंदोलन केलं. त्यामुळे व्यवसायिकांनी आम्ही कुठं जायचं हा सवाल उपस्थित केला आहे.
याठिकाणी हे व्यवसायिक गेल्या 50 ते 60 वर्षापासून पिढ्यानपिढ्या व्यवसाय करत आहेत. मात्र त्यांना आता याठिकाणाहून हटवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तसंच आमच्यावर होणारी कारवाई तत्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
हेही वाचा- मंत्री नवाब मलिक यांच्या मुलीच्या घरी NCBचा छापा, जावयाला अटक
या व्यावसायिकांचं म्हणणं आहे की, टाळेबंदीपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आम्हांला आश्वासन दिलं होतं की, आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मात्र अजूनही महापौरांनी काहीच हालचाल न केल्यामुळे त्यांना याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आंदोलनावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या आंदोलकांची भेट घेतली आणि आंदोलकांचं निवेदन स्विकारलं आहे.
यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, हा संपूर्ण प्रकार भेंडी बाजार परिसरातील आहे. त्या ठिकाणी असणारा वाद हा मुस्लिम समाजातील दोन जमातीचा आहे. मी नगरसेविका झाले त्यावेळी मी स्वतः व्हिजिट केली होती. महापालिकेने रस्ता मोकळा करून घ्यावा. मी आयुक्तांसोबत बोलते. आयुक्तांना रस्ता उघडून देण्यासाठी आदेश देईल. मी उद्या त्याठिकाणी भेट देईल आणि आयुक्तांना याबाबत माहिती देईल. पुढील आठवड्यापर्यत याबाबत निर्णय घेऊ आणि त्यांचा विषय मार्गी लावू.
Protest outside mayor Kishori Pednekar bungalow by traders Chor Bazaar