esakal | केंद्रासरकार विरोधात डोंबिवलीत निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

केंद्रासरकार विरोधात डोंबिवलीत निदर्शने

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीत काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि रिपब्लिकन सेना यांच्यावतीने केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. विष्णूनगर पोलिसांनी (police) काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखत त्यांना ताब्यात घेतले असता पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

Mumbai

Mumbai

उत्तर प्रदेश लाखीमपूर मध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती, त्याचे पडसाद डोंबिवलीत देखील पहायला मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन सेना कार्यकर्त्यांनी पश्चिमेतील मार्केट परिसरात जमून घोषणाबाजी केली.

हेही वाचा: भिवंडीत मनसेचे खळखट्याक आंदोलन, मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला

लोकशाहीचा गळा दाबणारी घटना यूपी मध्ये घडली आहे. अजय मिश्रा यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करतो. मोदी हे डोळे झाकून बसले आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना भेटण्यास प्रियांका गांधी या गेल्या असता पोलीस बळाचा वापर करून त्यांना अटक करण्यात आली. या सरकारच्या काळात महिलांचाही सन्मान केला जात नाही. शेतकरी हे आपले अन्नदाते आहेत पण त्यांच्या मागण्यांकडेच दुर्लक्ष केले जाते. मोदी सरकार डोळे झाकून बसले असून हे सरकार बरखास्त केले पाहिजे अशी मागणी यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव काँग्रेसचे संतोष केणे यांनी केली. यावेळी काळू कोमास्कर, राहुल केणे, प्रणव केणे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top