परमबीर सिंह यांना अडचणीत आणणाऱ्या प्रकरणात आरोपपत्र दाखल

पबमध्ये झालेल्या मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेशही फाटला
Param Bir singh
Param Bir singhGoogle

मुंबई: गांवदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पबमध्ये (Pub Case) मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सात जणांविरोधात पोलिसांनी नुकतेच आरोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले. या प्रकरणात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी आपल्यावर दबाव टाकून एकाचे नाव आरोपीच्या यादीतून काढण्यास सांगितल्याचा आरोप पोलिस निरीक्षक अनुप डांगे (Anup Dange) यांनी केला होता. या प्रकरणावरूनच डांगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात पोलिस महासंचालक आणि मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे तक्रारदेखील केली होती. या तक्रारी प्रकरणी नुकतेच गृहविभागाने चौकशीचे आदेशही दिले आहेत. (Pub Assault Case Charge sheet Filed against 7 people in which Parambir Singh has Connection)

Param Bir singh
शरद पवारांसोबतचा फोटो पोस्ट करत आव्हाडांनी दिली महत्त्वाची माहिती

23 नोव्हेंबर 2019 ला गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलिस तेथे गेले होते. त्यावेळी तेथे दोन गटांमध्ये सुरू असलेल्या मारहाणीप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी व निर्माता भरत शहाचा नातू यश, याचे दोन मित्र व तीन विरोधक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. त्यात पवार यांचा गणवेशही फाटला होता. त्यानंतर इतर पोलिसांनी मध्यस्थी करून पवार यांची सुटका केली व यश व त्याच्या काही मित्रांना घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

Param Bir singh
युद्धनौका त्रिखंडवरील ऑक्सिजन मुंबईत दाखल

या प्रकरणात जीतू नवलानीचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आले होते. या घटनेनंतर तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक असलेल्या परमबीर सिंग यांनी यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते, असा आरोप डांगे यांच्या लेखी तक्रारीत केला आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी तेथे जाण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर फेब्रुवारी, 2020 मध्ये परमबीर सिंग मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला होता.. त्यावेळी डांगे यांनी गावदेवी अधिका-यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर डांगे यांनी याप्रकरणी टाकलेल्या एका संदेशाची गंभीर दखल घेत अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात गृहविभागाला पत्र लिहून याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. डांगे यांनी परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंध व त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या दबावाप्रकरणी, तसेच भष्टाचाराप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती.

Param Bir singh
शाब्बास मुंबई..!! निती आयोगाच्या CEO कडून कौतुकाची थाप

तक्रारीनंतर हे प्रकरण महासंचालक संजय पांडे यांच्याकडे चौकशीसाठी सुपूर्त करण्यात आले होते.पण त्यांनी याप्रकरणी चौकशीला नकार दिल्यानंतर आता एका समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही(एसीबी) याप्रकरणी डिस्क्रीट इन्क्वायरीला(गोपनीय चौकशी) सुरूवात केली आहे. पबमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात नुकतीच गावदेवी पोलिसांनी सहा अटक आरोपी व एक पाहिजे आरोपी अशा सात जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com