
उल्हासनगर : रस्ते नाहीत, केवळ खड्डे आहेत... ही स्थिती ‘महानगर’ म्हणून मिरवणाऱ्या उल्हासनगर शहराची आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यानंतर आता टीओके (टीम ओमी कालानी)ने संतप्त जनतेच्या आवाजाला दिशा देत, "शर्म करो, खड्डा भरो" अशी झणझणीत मोहिम सुरू केली आहे. ही मोहीम सध्या शहरात चर्चेचा आणि प्रशासनासाठी धक्क्याचा विषय ठरत आहे.