पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती; वसईतील भालिवलीत मंदिरातील पुजाऱ्यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

वसई तालुक्यातील भालिवली येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गा कडेला असलेल्या डोंगरावर असलेल्या शिव मंदिराच्या पुजाऱ्यांना बुधवारी (ता.27)  रात्री दोन-तीन तरुणांनी मारहाण केल्याची तक्रार मांडवी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

विरार (बातमीदार) ः वसई तालुक्यातील भालिवली येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गा कडेला असलेल्या डोंगरावर असलेल्या शिव मंदिराच्या पुजाऱ्यांना बुधवारी (ता.27)  रात्री दोन-तीन तरुणांनी मारहाण केल्याची तक्रार मांडवी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे.             

मोठी बातमी ः कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी ‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’ ऑनलाईन मैफल 

काही दिवसापूर्वी तलासरी जवळ साधूंना मारण्याची घटना ताजी असतानाच काल रात्री मंदिरातील पुजाऱ्याना मारहाण झाल्याची घटना पुढे आली आहे. परंतु या घटनेत पुजाऱ्यांना चोरांनी मारहाण केल्याचे समजल्याने हे प्रकरण हुशारीने हाताळल्याचे समोर आले आहे.  याबाबतची अधिक माहिती अशी, भालिवली येथील जागृत महादेव मंदिरात शंकरानंद दयानंद सरस्वती (वय 54) हे पुजारी म्हणून काम करत असून शामसिंग सोमसिंग ठाकूर (वय 60) या सहकाऱ्यासह तेथेच वास्तव्यास आहे. बुधवारी रात्री ते सर्व कामकाज संपवून मंदिरा बाहेरील व्हरांड्यात झोपलेले असताना रात्री एकच्या सुमारास त्यांना कुत्र्याच्या भुंकण्यामुळे जाग आली. 

मोठी बातमी ः नवी मुंबईत उभारले खास कोव्हिड रुग्णालय; 'इतक्या' खाटांची असणार क्षमता

कुत्रा भुंकत असलेल्या दिशेला असलेल्या आंब्याच्या झाडामागे दबा धरून कोणी, तरी असल्याचे दिसल्याने त्यांनी त्याला हटकले. तेव्हा त्यांनाच दोघांनी मारहाण करून दान पेटीतील रक्कम आणि काही सामान घेऊन पोबारा केला. या वेळी त्यांनी घरावर दगडफेक केल्याने घराचे नुकसान झाले. दगडफेक करून पळून जात असलेल्यापैकी एकाला पकडण्यात यश आले आहे. मारहाण झाल्यावर पुजाऱ्यानी खानिवडे गावातील नागरिकांना हा प्रकार सांगितल्यावर ते धावून आल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी मांडवी पोलीस तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pujari of temple attacked by goons in vasai of palghar district