महाड-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प; वाघजाई घाटातील रस्ता खचला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून, पुणे जिल्ह्याच्या हद्दीत वाघजाई घाट येतो. या घाटावरील वाघजाई मंदिराजवळील रस्ता खचला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणारी संरक्षक भिंतही कोसळली आहे.

महाड (बातमीदार) : महाड-पंढरपूर तसेच महाडवरून पुण्याकडे जाणारा रस्ता घाटावरील वाघजाई मंदिराजवळ खचला आहे. यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक शुक्रवार (ता. 3) सायंकाळपासून बंद करण्यात आली आहे.

अरे बापरे ! आता संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या आनंद वाघालाही...

नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून, पुणे जिल्ह्याच्या हद्दीत वाघजाई घाट येतो. या घाटावरील वाघजाई मंदिराजवळील रस्ता खचला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणारी संरक्षक भिंतही कोसळली आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी बांधकाम विभागाकडून या ठिकाणची अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. लहान वाहनेही एकेरी मार्गाने सोडली जात आहेत. 

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ! मुंबईकरांनो हवामान खातं म्हणतंय....

महाडकडून पुणे, तसेच पंढरपूरकडे घाटातून जाणारा हा रस्ता आहे. येथून महाड औद्योगिक क्षेत्रामधील सामान, तसेच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते. पुण्याकडून येणाऱ्या एसटीच्या अनेक गाड्यांची वाहतूकही याच मार्गाने होते. मागील वर्षी पावसाळ्यामध्ये वाघजाई घाटात महान बांधकाम विभागाच्या हद्दीत हा रस्ता खचल्यामुळे येथील वाहतूक सुमारे 15 दिवस पूर्णपणे बंद होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune mahad road closed amid road broke out in waghjai ghat