esakal | पुणे-मुंबई महामार्गावर अपघात टाळण्यासाठी 'या' यंत्रणांचा नवीन प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

pune-mumbai

पुणे-मुंबई महामार्गावर अपघात टाळण्यासाठी 'या' यंत्रणांचा नवीन प्रयोग

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : पुणे-मुंबई महामार्गावरील (pune-mumbai highway) बोरघाटात (borghat) तीन ब्लॅक स्पॉट असून, त्यापैकी उतरत्या स्वरूपाचा रस्त्यावर असलेल्या दोन ठिकाणी अपघात टाळण्यासाठी (Accident care) सेव लाईफ फाउंडेशन, अफकॉन आणि महामार्ग पोलिसांच्या (highway police) संयुक्त विद्यमाने नवीन प्रयोग (new experiment) राबवला जात आहे. उतरत्या मार्गावर वाहनांचा वेग कमी होऊन सुरक्षित वाहतूक होण्यासाठी (safe journey) गेल्या चार दिवसांपासून दोन्ही ब्लॅकस्पॉटवर तिसरी लेन बंद करून वाहतूक सुरू आहे. त्यांनतर हाच प्रयोग रात्रीच्या दरम्यान सुद्धा केल्या जात असून, यादरम्यान अपघात टाळता आल्यास नेहमीसाठी हा प्रयोग राबवल्या जाणार आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचे सोशल इंजिनिअरिंग; वाचा सविस्तर

यावर्षी पुणे-मुंबई महामार्गावर जुलै अखेर एकूण 101 अपघात झाले आहे तर सुमारे 50 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बोरघाट सर्वाधिक अपघाताचे धोकादायक ठिकाण आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या बोरघाटातील उतरत्या रस्त्यावर वाहनांचा वेग वाढत असल्याने चालकांचे नियंत्रण सोडून किंवा उतरत्या रस्त्यावर डिझेल वाचवण्यासाठी ट्रक चालक वाहन न्यूट्रल करून वाहन चालवत असल्याने गंभीर अपघाताचे कारण आढळून येत आहे. त्याशिवाय कार चालकांकडून सीटबेल्ट न वापरण्यामुळेही अपघातांमध्ये मृतांचा आकडा वाढताना दिसून येत आहे.

त्यामुळे सेव्ह लाईफ फाऊंडेशन, अफकॉन आणि महामार्ग पोलिसांकडून नवीन प्रयोग केला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून बोरघाटातील दोन मुख्य ब्लॅकस्पॉटवरील तिसरी लेन बंद करण्यात आली आहे. त्यापूर्वी वाहनांना सूचना देऊन उतरत्या रस्त्यांवर वेग कमी करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. त्यामुळे ब्लॅकस्पॉट असलेल्या ठिकाणी दोन लेन मधूनच धोकादायक स्थळावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: मराठा समाजाच्या आरक्षणावर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

सध्या दिवसाला एकही अपघात झाला नसून, हाच प्रयोग रात्रीच्या वेळी सुद्धा करण्यात येत आहे. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटातील तीन ब्लॅक स्पॉट आणि जुन्या महामार्गावरील दोन असे एकूण तीन ठिकाणी नेहमीसाठी हा प्रयोग राबवल्या जाणार असल्याचे बोरघाट महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी सांगितले आहे.

"सेव्ह लाईफ फाऊंडेशन,अफकॉन आणि महामार्ग पोलिसांकडून संयुक्त बैठक करून बोरघाटातील 39 ते 39 किलोमिटर अंतरावर उतरत्या मार्गावर असलेल्या दोन ब्लॅक स्पाॅटवर तिसरी लेन बंद करून दोन लेन मधून वाहतूक हळुवारपणे काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यादरम्यान अपघातांना टाळण्यास यश मिळाल्यानंतर बोरघाटातील तीनही ठिकाणांवरील तिसऱ्या लेन बंद करण्याचा पॅच नेहमीसाठी वाढविण्यात येणार आहे. सध्या प्रयोगाची ट्रायल सुरू आहे."

- जगदीश परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस बोरघाट

loading image
go to top