पुणे विद्यापीठ कुलगुरूंच्या निवडीसाठी काकोडकर समिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती स्थापन करण्यात आली आहे.

जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार यारगट्टी तसेच सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे या कुलगुरू निवड समितीचे अध्यक्ष असतील. मंगळवारी डॉ. काकोडकर यांच्यासह समितीच्या सदस्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली. कुलगुरू प्रा. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे 2017 रोजी संपत असल्याने राज्यपालांनी ही निवड समिती स्थापन केली.

Web Title: Pune University chancellor's selection committee Kakodkar