बदलापुरात साकारणार पुण्याचा 'शनिवारवाडा'

बदलापुरात साकारणार पुण्याचा 'शनिवारवाडा'

बदलापूर : 'बदलापूरचा महाराजा' अशी ख्याती असलेल्या `स्टेशनपाडा माघी गणेशोत्सव मंडळा'तर्फे माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे 52 वे वर्ष असून, दरवर्षी आकर्षक देखावे सादर करणाऱ्या या मंडळातर्फे यंदा पुण्याचा प्रसिद्ध "शनिवारवाड्या'चा देखावा साकारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध सजावटकार नीती देसाई यांच्या संकल्पनेतून हा वाडा साकारला जाणार आहे.

बदलापूर रेल्वेस्थानक पूर्वेकडे गेल्या 51 वर्षांपासून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष हरिश्‍चन्द्र थोरात यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील जुना माघी गणेशोत्सव अशी या गणेशोत्सवाची ख्याती असल्याने रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोलीसह ठाणे जिल्हा आणि मुंबईतील भाविक मोठ्या संख्येने बदलापुरात हजेरी लावतात. उत्सवाच्या कालावधीत बदलापूरला जत्रेचे स्वरूप येते. या वर्षी श्रींसमोर प्रथमच महिलांची आवर्तने ठेवण्यात आली आहेत. 

4 फेब्रुवारीला सकाळी 7 ते 9 या कालावधीत होणाऱ्या अथर्वशीर्ष पठणमध्ये डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंत सुमारे 500 महिला उपस्थित रहाणार आहेत. याशिवाय मंडळाच्या वतीने 2 फेब्रुवारी रोजी मोफत चष्मेवाटप आणि 5 फेब्रुवारीला विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रोज सकाळी 9 ते 10 या कालावधीत गावदेवी महिला मंडळातर्फे आरती होणार आहे. 

समीर आंबवणे हे मूर्ती साकारणार असून, मंडळाचे सरचिटणीस विरेश धोत्रे, खजिनदार सचिन जाधव, उपाध्यक्ष विनोद जाधव, उल्हास आंबवणे, अविनाश खिलारे, योगेश धोत्रे, समीर मिरकुटे, राकेश जगे, प्रफुल्ल मोडक, दिनेश दहिवलीकर आदी सदस्य गणेशोत्सवाचे नियोजन करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com