धावत्या लोकलवर फेकली जातायत कुत्र्याची पिल्लं

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

मुंबई :   विकृतीची हद्द काय असते हे तुम्हाला ही  बातमी वाचल्यावर नक्की समजेल. महिलांवर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता महिलांना त्रास देण्यासाठी काही विकृतांनी नवीन युक्ती शोधून काढलीये. हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकाजवळ धावत्या लोकलमध्ये महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात कुत्र्याचे पिलू फेकल्याची घटना शनिवारी (ता. 8) घडली. त्यामुळे महिला प्रवाशांत घबराट पसरली.

 शनिवारी सायंकाळी 6.41 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेली पनवेल लोकल वडाळा ते गुरू तेगबहादूर नगर स्थानकांदरम्यान आली असताना अनोळखी व्यक्तीने सिमेंटच्या रिकाम्या गोणीत गुंडाळलेले कुत्र्याचे पिलू महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात फेकले. अचानक बाहेरून डब्यात काही तरी पडल्याचा आवाज आल्यामुळे महिलांमध्ये खळबळ उडाली.

डब्यात पडलेल्या गोणीतून कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आला. या गोणीतून बाहेर आलेल्या कुत्र्याच्या पिलास महिलांनी गुरू तेगबहादूर नगर स्थानकात उतरवले. वडाळा पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले. 

या बातम्या वाचल्या का ? 

puppy attack in mumbai most gross way to tease mumbai local women travelers 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: puppy attack in mumbai most gross way to tease mumbai local women travelers