esakal | मुंबईतील नद्यांचे शुद्धीकरण कागदावरच; निविदांना प्रतिसादच मिळत नसल्याने पुन्हा मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील नद्यांचे शुद्धीकरण कागदावरच; निविदांना प्रतिसादच मिळत नसल्याने पुन्हा मुदतवाढ

मुंबईतील नद्या शुद्ध करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.

मुंबईतील नद्यांचे शुद्धीकरण कागदावरच; निविदांना प्रतिसादच मिळत नसल्याने पुन्हा मुदतवाढ

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई  : मुंबईतील नद्या शुद्ध करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत नद्या शुद्धीकरणाबरोबरच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदांना प्रतिसादच मिळत नसल्याने तीन नद्यांचे शुद्धीकरण कागदावरच राहिले आहे. पालिकेने आता निविदांसाठी 25 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली आहे. 

मुंबईतील दहिसर, पोयसर आणि ओशिवरा नद्यांमध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह पुन्हा शुद्ध होणार आहे. त्यासाठी मलजल प्रक्रिया केंद्र उभारणे, नदीत येणाऱ्या मैला पाण्याचा प्रवाह रोखून तो प्रक्रिया केंद्रात आणणे आदी कामांसाठी महापालिका मे महिन्यापासून निविदा मागवत आहे. मात्र, वेळोवेळी मोठमोठ्या कंपन्यांनी त्यासाठी मुदतवाढ मागवली होती. आता तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. 29 डिसेंबर रोजी निविदा भरण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर मुदतवाढ न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, आता 25 जानेवारीपर्यंत निविदेसाठी मुदत वाढवण्यात आली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोव्हिडचा परिणाम

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यांना भारतीय कंपन्यांशी भागीदारीत हे प्रकल्प राबवायचे असल्यास त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, कोव्हिडमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे काही कंपन्यांकडून विलंब होत असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

नद्यांचा प्रवास...

- पोयसर नदी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत उगम पावून 10 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करून मार्वे खाडीत मिसळते. 
- दहिसर नदीचाही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम होतो. 12 किलोमीटरचा प्रवास करून ही नदी मनोरी खाडीत मिसळते. 
- ओशिवरा नदी आरे वसाहतीत उमग पावून 7 किलोमीटरचा प्रवास करून मालाड खाडीत मिसळते. 

Purification of rivers in Mumbai issue Extension again as tenders are not getting any response

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image